न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील दोन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्राण्यांना कोरोना होण्याचे हे अमेरिकेतील पहिलेच प्रकरण आहे.
जगात पाळीव प्राण्यांना कोरोना झाल्याच्या फार तुरळक घटना समोर आल्या आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी तर मानवामुळे कुत्रे, मांजरींना कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा केला आहे.
मानवामुळे एखाद्या श्वानाला कोरोनाचा संसर्ग झाला तरी कोरोनाग्रस्त श्वानामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना होत नाही. मात्र मांजरीमार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असेही काही संशोधकांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्कमधील या दोन्ही मांजरी वेगवेगळ्या स्थानांवरील आहेत. या मांजरी ज्या घरातील आहेत, तेथील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.