आंबे खरेदी करताना वापरा ‘या’ टिप्स आणि ओळखा गोड आंबा! नाहीतर खरेदी कराल आंबट आंबा

Ajay Patil
Published:
mango fruit

सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला असून या कालावधीमध्ये प्रत्येक घरामध्ये आमरसाचा बेत आखला जातो व अनेक खवय्यांना आमरस खाणे ही एक पर्वणीच असते. साधारणपणे अक्षय तृतीयेपासून मोठ्या प्रमाणावर आमरसाचा प्लान आणि कुटुंबांमध्ये केला जातो. पिवळे धमक आणि गोड आंब्याची खरेदी करून  स्वादिष्ट व गोड असा आमरस खाण्याची मजा काही औरच असते.

परंतु बऱ्याचदा आपण बाजारपेठेमध्ये आंबे खरेदी करायला जातो व खरेदी करण्यासाठी आपण पिवळा धमक दिसणाऱ्या आंब्याची निवड करतो. परंतु जेव्हा घरी येऊन तो आंबा खातो तेव्हा तो अपेक्षेपेक्षा आंबट निघतो व आपला पुरता हिरमोड होतो. याकरिता नुसता बाहेरून आंब्याचा रंग पाहून त्याला खरेदी करणे हे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे.

तसेच वेगवेगळे रसायने वापरून देखील आजकाल मोठ्या प्रमाणात आंबे पिकवले जातात व त्यामुळे ते नुसते पिकलेले दिसतात परंतु ते गोड असत नाहीत. म्हणून तुम्हाला देखील बाजारातून गोड आंबा खरेदी करायचा असेल तर त्याकरता काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. म्हणजेच तुम्ही काही छोट्याशा गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्ही आंबे खरेदी करताना फसवले जाणार नाहीत व नक्कीच गोड आंब्याचे खरेदी करू शकाल. त्या विषयाची माहिती आपण या लेखात बघू.

 या गोष्टींना लक्ष द्या आंबा गोड आहे की आंबट हे ओळखा

1- तुम्ही बाजारात आंबे खरेदी करायला गेलात तर आंबा गोड आहे की आंबट आहे या ओळखण्याच्या काही टिप्स आहेत व त्या तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यातील पहिली टिप्स जर बघितली तर सगळ्यात सोपी असून ती म्हणजे  आंब्याच्या रंगावरून आंबा गोड आहे की नाही याची पारख करणे. आंब्याचा रंग पिवळा, नारंगी असेल तरच तो खरेदी करावा. परंतु तेवढेच न पाहता त्या व्यतिरिक्त काही गोष्टींवर देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

2- आंब्याच्या खालचा म्हणजे देठाचा जो काही भाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूने असलेला भाग थोडासा दाबून पाहावा. जर तो बोटाने थोडासा दाबल्यानंतर दाबला गेला तर तो आंबा गोड असण्याची शक्यता असते.

3- आंब्याचा वास घेऊन त्यावरून देखील आंबा गोड आहे की आंबट हे ओळखता येते. कारण गोड आंब्याचा वास किंवा गोड आंब्याचा सुगंध हा अजिबात लपून राहत नाही.

4- तसेच महत्त्वाचे म्हणजे आंब्याच्या देठाकडचा भाग जर खोलगट झालेला असेल तर तो आंबा पिकलेला आणि गोड असतो.

अशाप्रकारे तुम्ही या चार प्रकारच्या साध्या आणि सोप्या टिप्स वापरून किंवा या गोष्टींकडे लक्ष देऊन आंबा आंबट आहे की गोड आहे हे सहजपणे ओळखू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe