Credit Card Use Tips :- सध्या क्रेडिट कार्ड वापराचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर असून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शॉपिंग केली जाते. आपल्याला बँकांकडून विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात व त्यामध्ये आपल्याला एक निश्चित असा खर्चासाठी लिमिट दिला जातो.
क्रेडिट कार्डचा वापर हा तसा खूप फायद्याचा आहे. परंतु क्रेडिट कार्ड वापरताना आपल्या काही चुका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप देऊ शकतात. क्रेडिट कार्डवर मिळणारा पैसा हा एक प्रकारे कर्ज स्वरूपातच मिळालेला असतो.
त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना तो खूप स्मार्ट पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. कारण जर आपण क्रेडिट कार्डवर आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा विचार केला तर ते खूप प्रचंड अशा दराने आकारले जाते.
त्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्डवर शॉपिंग किंवा काही खरेदी करताना ग्राहक म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. नाहीतर फायदे ऐवजी तोटाच सहन करावा लागू शकतो. त्या अनुषंगाने तुम्हाला जर क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
क्रेडिट कार्ड जरूर वापरा परंतु या गोष्टींवर लक्ष ठेवा
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट कार्डवर जी मर्यादा तुम्हाला दिलेली असते तिचा पूर्ण वापर न करता लिमिटच्या 30% पर्यंत वापर करणे कधीही फायद्याचे ठरते.
2- तुम्हाला या माध्यमातून बँकेकडून काही रकमेची सवलत दिली जाते. परंतु याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला लिमिट आहे म्हणून वाटेल तेवढी खरेदी तुम्ही करू नये.
3- काही झालं तरी क्रेडिट कार्डचे बिल मुदतीत आणि ठरलेल्या तारखेलाच भरणे गरजेचे आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणावर दंड भरावा लागू शकतो व त्याचा आर्थिक फटका तुम्हालाच बसतो.
4- क्रेडिट कार्डचे बिल भरताना मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय या पर्यायाची निवड करू नये. जर तुम्ही मासिक ईएमआयची निवड केली तर तुम्हाला यातून जास्त व्याज व जास्त रक्कम भरावी लागते व नुकसान तुमच्याच होते.
5- क्रेडिट कार्ड वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे क्रेडिट कार्ड वापरून केलेली खरेदी म्हणजे हे कर्जच असते व ते तुम्हाला फेडावेच लागते.
6- बँकेकडून बऱ्याचदा शून्य भाडे किंवा शून्य व्याज वाढ लिमिट वाढतो असं म्हटले जाते. परंतु असं बँक म्हणत असेल तरी देखील खात्री करूनच वापर करणे गरजेचे आहे.
7- क्रेडिट कार्डच्या बाबतीत काही गोंधळ झाला किंवा घोळ झाला तर तुम्ही ग्राहक न्यायालयांमध्ये यासंबंधी दाद मागू शकतात. परंतु त्याआधी तुम्हाला क्रेडिट कार्डसंबंधी सर्व नियम काळजीपूर्वक वाचणे खूप गरजेचे आहे.
8- क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला काही बाबतीत सोय उपलब्ध होते किंवा सुविधा मिळते. म्हणून या सुविधेचा किंवा सोयीचा फायदा घेऊन भरमसाठ व मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे टाळावे. जर असे केले तर तुम्ही घरबसल्या मानसिक त्रासाला आमंत्रण देत आहात हे कधीही विसरू नये.
त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना या छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी पाडल्या तरी तुम्हाला होणारा मानसिक व आर्थिक त्रासापासून तुम्ही वाचू शकता.