बाजारात कलिंगड घ्यायला गेला आहात तर ‘अशा पद्धती’ने ओळखा लाल आणि गोड कलिंगड! या टिप्स ठरतील फायद्याच्या

सध्या उन्हाळा सुरू झाला असून हळूहळू वातावरणामध्ये उकाडा जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण उसाच्या रसापासून तर अनेक फळांचे ज्यूस प्यायला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती देतो.

घामाने मखमखलेले शरीर आणि उकाड्यामुळे व्यक्ती हैराण होते व अशावेळी थंडगार ज्यूस प्यायला मिळाला तर मनाला खूप बरे वाटते. तसेच दुसरे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खाण्याला देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.

लाल बूंद तसेच रसरशीत व गोड कलिंगड खाण्याची मजा उन्हाळ्यामध्ये काही औरच असते. परंतु जेव्हा आपण बाजारामध्ये कलिंगड घ्यायला जातो तेव्हा बऱ्याचदा आपला गोंधळ उडताना दिसतो. कारण कलिंगडच्या बाह्य स्वरूपावरून आपल्याला आतील कलिंगड गोड आहे की नाही किंवा लाल आहे की नाही हे ओळखता येत नाही.

तरीपण आपण कलिंगड खरेदी करून घरी आणतो. परंतु बऱ्याचदा अशा पद्धतीने आणलेले कलिंगड हे लालबुंद किंवा रसरशीत नसते किंवा गोड देखील नसते. अशावेळी आपल्याला पश्चाताप होतो.

 या टिप्स वापरा आणि गोड रसरशीत कलिंगड खरेदी करा

1- कलिंगडावरील जाड पिवळे ठिपके बऱ्याचदा आपण जेव्हा बाजारामध्ये कलिंगड खरेदी करतो तेव्हा दिसायला आकर्षक व चमकदार असलेले कलिंगड खरेदी करायला प्राधान्य देतो. परंतु बऱ्याचदा असे कलिंगड आतून लाल आणि गोड देखील नसते व आपली फसगत होते.

त्यामुळे कलिंगड खरेदी करायचे असेल तर ते बाहेरून पिवळे आणि ठिपके असलेले असेल तरच खरेदी करावे. कारण जेव्हा कलिंगड वेलीवर असताना परिपक्व होते तेव्हा ती पिवळे पडते.

याशिवाय वजनदार असलेले कलिंगड खरेदी करावे. कलिंगडामध्ये सुमारे 92% पर्यंत पाणी असते व ज्यामुळे ते चवीला प्रचंड रसदार देखील लागते.

2- खरेदी करताना कलिंगड दाबून पहा आणि आवाज ऐकून खरेदी करा कलिंगड खरेदी करण्याच्या अगोदर त्याला हातात घेऊन त्यावर हाताने टॅप करा किंवा हाताने त्याला हळुवारपणे मारा.

जर ते कलिंगड गोड असेल तर त्यातून ढक-ढक असा आवाज येईल. कलिंगड गोड नसेल तर त्यातून कुठलाही आवाज येणार नाही.

3- कलिंगड खरेदी करण्यापूर्वी त्याचा आकार बघा जेव्हा तुम्ही बाजारामध्ये कलिंगड खरेदी करायला जाल तेव्हा खरेदी करताना त्याचा आकार बघणे खूप गरजेचे आहे.

साधारणपणे अंडाकृती आकाराचे कलिंगड हे गोडच असतात. त्यामुळे वाकड्यातिकडे आकाराचे किंवा गोल आकाराचे कलिंगड घेण्यापेक्षा फक्त अंडाकृती असलेली कलिंगड असेल तरच खरेदी करण्याला प्राधान्य द्या.