Uses of Papaya Leaf : पपई आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपण जाणतोच पण तुम्हाला माहिती आहे का ? फक्त पपईच नाही तर त्याची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच आज आपण पपई नाही तर त्याच्या पानांच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग पपईची पाने आपल्या आरोग्यसाठी किती फायदेशीर आहेत, जाणून घेऊया…
पपईची पाने आरोग्यदायी गुणधर्मांनी समृद्ध असतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 17 यांसारखी पोषक घटक आढळतात. तसेच यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात. याशिवाय पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॅटी अॅसिड, फॉस्फरस ही खनिजेही त्यात असतात. चला याच्या फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर
याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. पपईच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवते. हे चहा किंवा रस स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. तुम्ही कसे सेवन करता हे तुमच्यावर आहे.
केसांच्या अनेक समस्यांवर उपाय
पपईच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. व्हिटॅमिन ए देखील आहे. जे केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या वापराने केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. यापासून बनवलेले हेअर मास्क किंवा त्याचा रस सेवन केल्याने केसांची वाढ गतिमान होते. तसेच केस मजबूत आणि घट्ट होतात.
महिलांसाठी वरदान आहे
पपईच्या पानांपासून बनवलेला ज्यूस महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. याचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
त्वचेसाठी देखील फायदेशीर
पपई त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. याचे सेवन केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. त्वचा तरुण दिसते. यामध्ये प्रोटीन विरघळणारे एन्झाईम्स उपलब्ध असतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
पचनाच्या समस्यांपासून अराम
पपईचे पान पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विविध प्रकारचे एन्झाइम्स आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याचे सेवन केल्याने पोटदुखी, जुलाब, अॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.