Vastu Tips Before Home Buying:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे एक स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. घर घेताना कधी कधी ते घर बांधलेले खरेदी केले जाते किंवा नवीन बांधायला दिले जाते.
घर खरेदी करणे असो किंवा घर बांधणे असो तेव्हा आपण घरामधील सोयीसुविधा तसेच बेडरूम पासून तर किचन पर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेत असतो व जितके घर सुंदर दिसेल अशा प्रकारचा शक्य तेवढा प्रयत्न करत असतो. परंतु यामध्ये बरेच जण वास्तुशास्त्राचे नियम मात्र विसरतात.

घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही नियम माहित असणे तितकेच गरजेचे आहे व त्याचा अवलंब करूनच तुम्ही घर खरेदी करणे किंवा बांधणे फायद्याचे ठरेल.
नाहीतर काही दिवसात उगीचच काहीतरी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना किंवा घर खरेदी करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी? याबद्दल काही नियम आहेत व त्याचीच माहिती थोडक्यात आपण बघणार आहोत.
नवीन घर खरेदी करण्याअगोदर किंवा बांधताना या गोष्टींची काळजी घ्या
1- घरातील महत्त्वाच्या गोष्टींच्या दिशेकडे लक्ष देणे- वास्तुशास्त्रानुसार बघितले तर तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी करत असाल तर त्याचा मुख्य दरवाजा उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला असावा. कारण या दिशेला दरवाजा असलेले घर वास्तुशास्त्रामध्ये उत्तम मानले गेले आहे.
2- घरात पडणारी सूर्यकिरणे- वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जर सकाळी किंवा संध्याकाळी सूर्याचे किरणे जर तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतील तर ते वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरात उत्तरेकडून पूर्वेकडे अधिक मोकळी जागा असावी.
3- स्वयंपाकघर आणि बेडरूमची दिशा- घर बांधताना किंवा घराची खरेदी करताना तुमचे स्वयंपाक घर आग्नेय दिशेला असावे. तसेच घराची मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी तसेच मुलांची खोली ही घरामध्ये उत्तर-पश्चिम दिशेला असावी.
4- देवघराची दिशा- घर बांधत असाल किंवा घर खरेदी करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामधील देवघर अर्थात देव्हारा हा ईशान्य दिशेला असणे गरजेचे आहे.
5- घराच्या आकारावर लक्ष द्यावे- वास्तुशास्त्रानुसार घराचा आकार कसा असावा याबद्दल देखील माहिती बघितली तर त्यानुसार तुम्ही घर खरेदी करणार असाल किंवा बांधणार असाल तर त्या घराच्या आकाराची काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घर किंवा फ्लॅट हा आयताकृती किंवा चौकोनी असावा.