Vastu Tips:- वास्तुशास्त्रामध्ये घराची अंतर्गत व बाह्यरचना कशी असावी? घरामध्ये कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी ठेवावी तसेच कोणते फोटो कोणत्या ठिकाणी ठेवावे किंवा कोणत्या दिशेला लावावे?
इत्यादी अनेक गोष्टींबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे व त्यामुळे बरेच व्यक्ती हे नवीन घराचे बांधकाम करताना किंवा घराची अंतर्गत सजावट करताना बहुतेक वास्तुशास्त्राच्या नियमानुसार करतात.

अगदी घरातील बेडरूम कोणत्या दिशेला असावेत किंवा किचन कसे असावे? या प्रकारचे घराची अंतर्गत रचना देखील वास्तुशास्त्रानुसारच करण्यावर भर दिला जातो. याच अनुषंगाने जर आपण बघितले तर घरामध्ये जर धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावला तर नेमकं काय फायदा होतो? इत्यादी बद्दल देखील महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सात धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने काय होतो फायदा?
धावणारा घोडा हा प्रगती तसेच सामर्थ्य व यशाचे प्रतीक मानले जाते. तसेच सात धावणारे घोडे आर्थिक समृद्धीला गती देतात असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीने घरामध्ये धावत्या घोड्याचे चित्र लावले तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये बुद्धी तसेच प्रेम व पवित्रता इत्यादी गुण तर असतातच
परंतु त्यांच्या जीवनात ते नेहमी यशस्वी असतात. परंतु घरामध्ये जर धावत्या घोड्याचे चित्र लावायचे असेल तर ते नेमके कोणत्या दिशेला लावावे व काय फायदा होतो याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती दिली आहे.
धावत्या घोड्याचे चित्र घरात कोणत्या दिशेला लावावे व काय फायदा मिळतो?
1- दक्षिण दिशा– वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचा फोटो अनेक घटकांशी संबंधित असून घरामध्ये जर तुम्ही दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचा चित्र किंवा फोटो लावले तर घरामध्ये यश आणि कीर्ती वाढते.
2- उत्तर दिशा– धावत्या घोड्यांचे चित्र घराच्या उत्तर दिशेला लावल्यास घरात सुख समृद्धी नांदते व धनाची भरभराट होते. एवढेच नाही तर दुकान आणि ऑफिसमध्ये धावत्या घोड्यांची मूर्ती बसवली तर ते खूप शुभ मानले जाते.
3- पूर्व दिशा– सात धावत्या घोड्यांचे चित्र जर तुम्ही घराच्या पूर्व दिशेला लावले तर तुमचे करिअर चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते व या दिशेने चित्र लावल्याने प्रगती देखील होते. तुम्ही तुमच्या स्टडी रूम किंवा लिविंग रूम मध्ये देखील हे चित्र लावू शकतात.