रविवारी तुळशीची पाने का तोडू नये ? जाणून घ्या यामागचे कारण, थेट माता सीतासोबत आहे कनेक्शन

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi news

Marathi news : हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार तुळशीच्या झाडाची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. शास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

वास्तुशास्त्रात तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध असण्याबरोबरच याच्या वापरामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. त्यामुळे दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. यामागे एक प्रचलित आख्यायिका आहे. ज्याचा संबंध माता सीता आणि श्रीरामांशी आहे.

चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल –

* रविवारी तुळशीचे पाने न तोडण्यामागची आख्यायिका

सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा प्रभू रामाने धनुष्य तोडले होते, त्यानंतर एकदा गुरु विश्वामित्र भगवान शालिग्रामची पूजा करीत होते, तेव्हा त्यांनी श्रीरामांना बागेतून काही फुले आणि तुळशीची पाने आणण्यास सांगितले. पण यावेळी गुरूंना माता सीता समोर दिसल्या. त्यांनी भगवान रामाला सांगितले की, येथील फुलांची बाग देवी सीतेची आहे.

त्यामुळे तेथून फुले आणि तुळशीची पाने आणण्यास तयांचा सांगावे. अशा तऱ्हेने त्यांचे म्हणणे ऐकून माता सीता बागेत गेली. तेथून फुले व तुळशीची काही पाने घेऊन निघाल्या. पण जोरदार वाऱ्यामुळे त्यांचा पदर तुळशीच्या झाडात अडकला आणि तुळशीची अनेक पाने जमिनीवर पडली.

माता सीतेने भगवान रामाला तुळशीची पाने आणि फुले दिली आणि त्यांनी जाऊन गुरु विश्वामित्रांना दिली. विश्वामित्रांनी तुळशीची पाने घेतली तेव्हा ती खूप भिजली होती. मग शालिग्रामला अर्पण करण्याचा प्रयत्न करताच तो तळहाताला चिकटून राहिले. अशा तऱ्हेने विश्वामित्र विचार करू लागले की तुळशीची पाने कशी भिजली.

त्यांनी रामाला विचारले, “तू तुळशीची पाने धुतलीआहेस का?” त्यांनी नाही असे उत्तर दिले. तेव्हा विश्वामित्रांनी तुळसीच्या पानांना विचारले असता त्यांनी घडलेली हकीकत सांगितली व इतर पाने तुटल्याने आम्हाला दुःख झाले व त्याने आमचे अश्रू बाहेर आले असे सांगितले .

तेव्हा विश्वामित्रांनी ती तुटलेली पाने माता सीतेला पुन्हा झाडाला जोडण्यास सांगितले. परंतु ते शक्य नसल्याने व माता सीतेने माफी मागितल्याने विश्वामित्रांनी ते तुटलेले सर्व पाने शाळिग्रामला अर्पण करण्यास सांगितले. त्यादिवशी रविवार होता. त्यामुळे रविवारी पाने तोडू नयेत असे मानले जाते.

(सूचना : सदर घटना ज्ञानावर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाहीत)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe