‘या’ हार्मोन्समुळे महिलांचं वाढते वजन; करा ‘हे’उपाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020महिलांना वजनवाढीची समस्या असते. हार्मोनच्या पातळीतील चढ-उतारामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घेऊयात या हार्मोन्सविषयी व उपायांविषयी –

 १)    थायरॉइड

  थायरॉइड ग्रंथीमुळे शरीरामध्ये तीन प्रकारचे हार्मोन तयार होते. ‘टी 3’, ‘टी 4’ आणि कॅल्सिटोनिन अशी हार्मोनची (संप्रेरके) नावं आहेत. शरीरातील इतर अंत:स्रावी ग्रंथी जशा मेंदूच्या नियंत्रणात असतात, त्याप्रमाणे थायरॉइड ग्रंथीही मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे नियंत्रित केल्या जातात.

 याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोन (टी3 आणि टी 4) शरीराची चयापचय प्रक्रिया (मेटाबोलिझम), शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, झोप, हृदयाची गती, शारीरिक आणि मेंदूचा विकास करण्याचंही कार्य नियंत्रित करत असतात.

कधी-कधी थायरॉइड ग्रंथी या हार्मोनची योग्य प्रकारे शरीरात निर्मित करत नाही. ज्यामुळे हायपोथायरॉइडीसीम हा थायरॉइड संबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते.

उपचार

थायरॉइडसंबंधित आजारांची नियमित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या

फ्लावर, कोबी, ब्रोकोली, कांद्याची पात यांचे कच्च्या स्वरुपात सेवन करणं टाळा. भाज्या शिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल

आयोडीनयुक्त मिठाचे सेवन करा

झिंकयुक्त आहाराचे सेवन करा. उदाहरणार्थ शिंपल्या आणि भोपळ्याची बी

फिश ऑइल आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहार घ्यावा.

२) कॉर्टिसोल

शरीरासाठी कॉर्टिसोल हे हार्मोन अतिशय गरजेचे आहे. कॉर्टिसोलचे खूप जास्त तसंच खूप कमी प्रमाण शरीरासाठी हानिकारक असते. ताणतणाव, शारीरिक दुखापत, नैराश्यामुळे कॉर्टिसोलचं शरीरात प्रमाण वाढू लागतं.

उपाय

 नियमित योगासने, ध्यानधारणा आणि व्यायाम करावा

लोकांच्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करणं टाळावं

सात ते आठ तासांची झोप घेणे

मद्यपान, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा

सकारात्मक विचारांवर भर द्या, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवा

३) मेलाटोनिन

 शरीरात मेलाटोनिनची पातळी संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाढते आणि पहाटेच्या सुमारास ती कमी होते. यामुळे आपल्या शरीराला चांगले लाभ मिळतात. पण बहुतांश जणांना व्यस्त वेळापत्रकामुळे पुरेशी झोप मिळणं कठीण असते.

परिणामी शारीरिक ताणतणाव वाढ झाल्यानं मेलाटोनिन हार्मोनच्या पातळीवर वाईट परिणाम होते. मेलाटोनिनची पातळ कमी झाल्यानं झोपेवर वाईट परिणाम होते. पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यानं वजन वाढीच्या समस्या निर्माण होतात. शरीरात मेलाटोनिन हे एक झोपेचे रसायनं आहे.

उपाय

अंधाऱ्या खोलीत झोपा

सात ते आठ तासांची झोप घ्या

रात्री उशिरा अन्नपदार्थ खाणे टाळा

झोपण्यापूर्वी मोबाइल बंद करा

केळ, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा

४) इन्सुलिन

इन्सुलिन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याचं कार्य करते. ज्याचा शारीरिक ऊर्जेच्या स्वरुपात उपयोग केला जातो. पण रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढू लागल्यास वजन वाढणे आणि टाइप 2 मधुमेहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी साखर, दारू आणि आरोग्यास अपायकारक ठरू शकतात अशा पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

उपाय

आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

आठवड्यातून चार तास व्यायाम करण्यावर भर द्या

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, मद्यपान, जंकफुड, प्रक्रिया करून तयार केलेले गोड पेये किंवा पदार्थांचं सेवन करणं टाळा

हिरव्या पालेभाज्या, भाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करा

शरीरातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडीची पातळी सुधारण्यासाठी मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑईल आणि अळिवाच्या बियांचं सेवन करा.

कमी कॅलरीयुक्त पदार्थांचांचे सेवन करण्यासाठी भर द्या. पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा.

तीन ते चार लीटर पाणी नियमित प्यायले पाहिजे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment