अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : बऱ्याचदा एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर रोमॅन्टिक डिनर डेट्स, किंवा बाईक रपेट किंवा मस्त एकत्रित फिरणे आदी गोष्टी सुखावह वाटतात. परंतु यासाठी दोघांचेही प्रेम असणे गरजेचे असते. एकतर्फी प्रेमातून हे शक्य होत नाही.
जर तुम्हाला ‘तो’ किंवा ‘ती’ आवडत नसेल तर वेळीच करा खालील उपाय- १) तुम्ही जितका वेळ एकत्र घालवाल तितका चुकीचा संदेश समोरच्याला जात असतो हे नेहमी लक्षात ठेवावे. यासाठी वेळीच जवळीकता कमी करा.

२) फोन किंवा चॅटिंग द्वारा सातत्याने बोलत राहिल्यास कनेक्टिव्हिटी वाढत जाते. यासाठी असे करणे टाळावे.
३) जर तुम्ही त्याच्या प्रेमात नसाल, तर शारिरीक जवळीक करू नका. चुंबन घेणे , हात हातात घेणे टाळा. प्रेमात नसताना अशा संबंधाना वेळीच नकार न दिल्यास त्यातून चुकीचा समज होऊ शकतो.
४) जर तुम्हाला त्याच्या प्रेमात राहायचे नसेल तर तर प्रामाणिकपणे नात्यातील स्पष्टता समोर येऊ द्या. मात्र याबाबत बोलताना संयम बाळगा.
अतिरेकी किंवा उद्धटपणे बोलू नका. तुम्हा दोघांत मैत्री पलिकडे काही नाही हे समोरच्याला समवून द्या. यामुळे नाते हे निर्भेळ राहील.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews