सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.

परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- शिर्डीमध्ये शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन ! डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट
- Indian Bank Apprentice Jobs 2025: इंडियन बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी! अप्रेंटिस पदाच्या 1500 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- मुंबईवरून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला एक अतिरिक्त थांबा मंजूर, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय
- सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ ; पामतेल, सूर्यफूल, शेंगदाणे, सोयातेल खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागतात ?
- पेट्रोल पंप मालकांना दर महिन्याला किती नेट प्रॉफिट मिळतो ? 10 लिटर पेट्रोल आणि डिझेल विक्रीनंतर ‘इतके’ कमिशन मिळते !