मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

Ahmednagarlive24
Published:

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न कर‍ण्यात येत असून उद्यानांचा विकास करण्‍याच्‍या पुढे जाऊन आता मियावाकी या जपानी पद्धतीने वनीकरण करण्‍यावर अधिक लक्ष देण्‍यात येत आहे. कमी जागेत घनदाट अशी वृक्ष लागवड करण्‍याची ही पद्धत उपयोगात आणून शहरात 64 ठिकाणी वृक्षारोपण करण्‍यात येणार आहे.

मुंबईसारख्या शहरात काँक्रेटीकरण वाढत असताना वनीकरणाचा महापालिकेचा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. जपानच्या या मियावाकी पद्धतीनुसार वृक्षलागवड केल्यास कमी कालावधीत वृक्षाच्छादित जमीन तयार करता येते. या पद्धतीमुळे कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावली जात असल्याने एकप्रकारे झाडांच्या फांद्यांमुळे तयार होणारी छत्री आहे ती महत्त्वाची आहे. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर, विनायक मेटे, महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment