नागपूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रसेचे आशीष देशमुख लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
यामध्ये ही घोषणा करण्यात आली. या यादीत १९ उमेदवारांचा समावेश असून, काँग्रेसने आतापर्यंत १४० उमेदवार जाहीर केले आहेत. चौथी यादी जाहीर करतानाच काँग्रेसने सिल्लोड आणि नंदुरबारमधले उमेदवारदेखील बदललेले आहेत. वर्सोवा येथून बलदेव खोसा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेसचे चौथ्या यादीतील उमेदवार पुढीलप्रमाणे : उदयसिंग पाडवी (नंदुरबार), डी. एस. अहिरे (साक्री), साजिद खान (अकोला पश्चिम), सुलभा खोडके (अमरावती), बलवंत वानखेडे (दर्यापूर), आशीष देशमुख (नागपूर दक्षिण पश्चिम), सुरेश भोयर (कामठी), उदयसिंग यादव (रामटेक), अमर वरदे (गोंदिया), महेश मेंढे (चंद्रपूर), माधवराव पवार (हदगाव), खैसार आझाद (सिल्लोड), विक्रांत चव्हाण (ओवळा माजिवाडा), हिरालाल भोईर (कोपरी पाचपाखाडी), बलदेव खोसा (वर्सोवा), आनंद शुक्ला (घाटकोपर पश्चिम), लहू कानडे (श्रीरामपूर), सुशील राणे (कणकवली), राजू आवळे (हातकणंगले)
- अहिल्यानगरमध्ये स्व. अरूणकाका जगताप यांचा पुतळा उभा राहणार, व्यापारी संघटनांची मागणी
- सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल ! 19 मे रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
- शेतकऱ्यांनो ‘एक रुपया पीकविमा’ योजना सरकारने केली बंद, आता वाढीव हप्ता भरावा लागणार, जाणून घ्या सविस्तर!
- कोपरापासून हात नाहीत..! दहावीत पटकावला तिसरा क्रमांक, अहिल्यानगरमधील समीरची जिद्द…
- शेतकऱ्यांनो खते आणि बियाणे शासनमान्य दुकानातून खरेदी करा अन् पक्कं बिल घ्यायला विसरू नका, कृषी विभागाचे आवाहन