नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले !

Published on -

मुंबई : सहाव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून मृत्यू झालेल्या मालाडमधील दोन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. नातवाशी खेळताना होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून आजीनेच नातीला सहाव्या माळ्यावरून फेकून हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली.

कुरार पोलिसांनी क्रूर आजीला अटक केली आहे.. मालाड येथील आप्पापाडा परिसरातील एसआरए बिल्डिंगमधील सहाव्या माळ्यावर रुक्साना अन्सारी ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. रुक्साना हिच्या मुलाची दोन वर्षीय मुलगी जिया हिच्या अपमृत्यूची नोंद कुरार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

तिचा राहत्या इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळाची बारकाईने केलेली पाहणी तसेच शवविच्छेदन अहवालावरून मुलीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe