१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांकडून तब्बल पाच महिने लैंगिक अत्याचार

Published on -

अहमदनगर –  श्रीगोंदे – 
गरीब कुटुंबातील १४ वर्षांच्या मुलीवर पाच महिने वेळोवेळी अत्याचार केले. ही मुलगी गर्भवती राहिल्याचे आईच्या निदर्शनास येताच बेलवंडी पोलिस ठाण्यात तिने शुक्रवारी फिर्याद दिली.


भानुदास गंगाराम भिसे (३०) व नामदेव अंबू आडागळे (६५, दोघेही चिंभळे, धारकरवाडी) ही या  नराधमांची नावे आहे.  पोलिसांनी या नराधमांविरूध्द गुन्हा दाखल करत आडागळे याला अटक केली आहे. 


तू मला फार आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे सांगून भिसे याने या मुलीवर ५ महिन्यांपासून अत्याचार केले. शेजारी राहणाऱ्या आडागळे याला हे समजले. मी तुझ्या आई-वडिलांना, नातेवाईकांना सांगेन अशी धमकी देत या वृद्धानेही मुलीवर लैंगिक अत्याचार केले. 


मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला प्रथम श्रीगोंदे साखर कारखाना येथील एका खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. काष्टी येथील खासगी रूग्णालयात तपासणी केल्यावर मुलगी तीन ते चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


मुलीला विश्वासात घेतल्यावर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती आईला सांगितली. आईच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आडागळे यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी भिसे फरार आहे.  पुढील  तपास बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने करत आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe