१५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- हडपसर येथील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोन आरोपींना गुरुवारी रात्री जेरबंद केले असून त्याचे मित्र फरार झाले. दरम्यान, पालकांशी वाद झाल्याने पीडित मुलगी घर सोडून मित्राला भेटायला निघाली असताना ही घटना घडली. मंगळवारी पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पाेलिस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, पोलिसांना मुलगी गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना पकडले.

संबंधित पीडित मुलीचा तिच्या पालकांसोबत वाद झाला होता. यामुळे रागारागाने ती मित्राला भेटायला घरातून निघाली होती. या वेळी रस्त्यात एक आरोपी तिला भेटला. त्याने तिला मित्राकडे सोडतो, असे सांगितले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तिने सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!