१६ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,पीडित मुलगी गर्भवती ! या तालुक्यातील धक्कादायक प्रकार …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव याने विद्यार्थिनीची संमती नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने सोमनाथ भानुदास म्हस्के व त्याचा चुलत ‘भाऊ दादासाहेब म्हस्के यांच्या शेतात नेवुन आरोपीने विद्यार्थिनीवर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला.

अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीची संमती नसताही बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली. यात पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याप्रकरणी गावातीलच आरोपी विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील एका गावातील १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपीने तीची संमती नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने परिसरातील एका शेतात नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हा प्रकार दि.१४ फुेब्रवारी ते ४ जुलै २०२० या दरम्यान घडला. त्यामुळे सदरची पिडीत विद्यार्थिनी गर्भवती असून काल तिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून,घटनास्थळी नगर ग्रामीणचे डिवायएसपी पाटील तसेच तालुक्याचे पोलिस निरीक्षक राजपूत यांनी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment