१६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेत बलात्कार

Ahmednagarlive24
Published:
अकोले :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर एकाने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 
पावळदरा घाट ते कोतुळ या रस्त्याने पावळदरा येथून पोखरी येथे शाळेत जात असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी अविनाश वामन मधे , रा , म्हसोबा झाप , पारनेर याने दुचाकीवर बसवून घाटातून पळवून नेले व तिला आडबाजूला नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध करुन बलात्कार केला.
 तू जर ओरडली तर तुला जिवे ठार मारीन , अशी धमकी दिली. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने पारनेर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अविनाश मधे याच्याविरुद्ध  गन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment