घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी 3 टक्के कपात – महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे

त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सूट दिली जाणार आहे.

१ सप्टेंबरला १ वाजता रजिस्ट्रेशन सुरू ठेवणार आहो. रियल इस्टेट क्षेत्राला याचा फायदा होईल आणि गती येईल. असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment