‘पीएम २.५’ वायुप्रदूषणाने मुंबई-पुण्यासह १० शहरांत दरवर्षी  ३३ हजार बळी !

Published on -

मुंबई-पुण्यासह देशातील १० प्रमुख शहरांत वायुप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी ३३ हजार लोकांचा बळी जात असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या १० शहरांमधील मृत्यूंपैकी तब्बल ७.२ टक्के लोकांच्या मृत्यूस प्रदूषणाची ‘पीएम २.५’ ही पातळी कारणीभूत आहे, असा धक्कादायक खुलासा ‘द लांसेट’ संस्थेने शुक्रवारी केला.

२००८ ते २०१९ या काळात देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, शिमला व वाराणसी या शहरांत वायुप्रदूषणामुळे एकूण ३६ लाख बळी गेल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे.वाराणसी स्थित बनारस हिंदू विद्यापीठ व नवी दिल्लीच्या ‘सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज’ येथील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या द लांसेट संस्थेच्या संशोधकांनी भारतात ‘पीएम २.५’ प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडण्याबाबत अध्ययन केले.

प्रामुख्याने २००८ ते २०१९ या काळात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला व वाराणसी या १० शहरांतील वायुप्रदूषणामुळे उद्भवलेली परिस्थिती संशोधकांनी जाणून घेतली. त्यानंतर ‘द लांसेट प्लॅनेटरी हेल्थ’ पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, ‘पीएम २.५’ वायू प्रदूषणामुळे होणारे दैनंदिन व वार्षिक मृत्यू सर्वाधिक दिल्लीत होत आहेत.

भारतीय शहरांमध्ये ‘पीएम २.५’ प्रदूषणाच्या विळख्यात सापडून मृत्यू ओढावण्याचा धोका अधिक आहे. स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे लोक मृत्यूच्या दाढेत ओढले जात असल्याचा दावा लांसेटच्या संशोधकांनी केला. दोन दिवसांत (अल्पकालीन जोखिमेत) गणलेले सरासरी सूक्ष्म कण पदार्थ अर्थात ‘पीएम २.५’ या प्रदूषणात १० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर वृद्धीचा संबंध १.४ टक्के दैनंदिन मृत्यू दरापेक्षा अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

सद्यःस्थितीत भारतातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणामुळे मृत्यूचा धोका वाढला आहे. भारतीय शहरांत दररोज ‘पीएम २.५’ प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने लोक मरण पावत आहेत. शहरनिहाय अध्ययनात देशाची राजधानी दिल्लीत ‘पीएम २.५’ मध्ये १० मायक्रोग्राम प्रती घनमीटर वृद्धी झाल्याने दैनंदिन मृत्यू दर ०.३१ टक्के वाढला आहे. तर बंगळुरूत हेच प्रमाण ३.०६ टक्के एवढे आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, ‘पीएम’ अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत भारतातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणामुळे मृत्यूचा धोका वाढला आहे. भारतीय शहरांत दररोज ‘पीएम २.५’ प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने लोक मरण पावत आहेत.

२.५’ एक प्रकारचे वायू प्रदूषक आहे. हा २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यास असणारा कण असतो. हे कण एवढे बारीक असतात की ते श्वसनातून शरीरात गेल्याने फुफ्फुसांत संसर्ग होतो. त्यामुळे मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

अकाली मृत्यू ओढावणे, हृदयरोग किंवा फुफ्फुसाचा संसर्ग होऊ शकतो. भविष्यात त्या व्यक्तीला आस्थमा, श्वसनविकार तसेच इतर आजारसुद्धा जडू शकतात. वाहनांचा धूर व उद्योगांमधून होणारे उत्सर्जन यामुळे ‘पीएम २.५’ एवढे प्रदूषण होत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!