अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागांत 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह असणार संपूर्ण लॉकडाऊन !

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेल्या नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर संगमनेर शहरातील काही भाग,  आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी घोषीत केले आहे.

या सर्व ठिकाणी 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा, नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगार जवळील आलमगीर आणि जामखेड शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत.

यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या क्षेत्राला जिल्ह्यातील हॉटस्पॉट पॉकेट घोषीत केले आहे. या भागाच्या भागाच्या मध्यबिंदूपासून दोन किलो मीटरचा परिसर हा कोरोना क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

यामुळे या भागातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री आदी हे आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून 14 एप्रिलच्या रात्री 12 पर्यर्ंत बंद राहणार आहेत. तसेच या भागातील व्यक्तींना घराच्या बाहेर सोडा तर येथून ये-जा देखील करता येणार नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe