राज्यातील ४२८ पोलिसांची कोरोनावर मात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  देशभरात पोलीस प्रशासन कोरोनाशी दोन हात करत आहे. परंतु या युद्धात अनेक पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली.

राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर गेला आहे.

मात्र उपचाराअंती ४२८ पोलीस कोरोनमुक्त झाले आहेत.

यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने म्हटले, ‘मला माहिती होते की,

माझ्या कुटुंबात फक्त ४ माणसे नसून तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात.

तुमच्यासाठी लवकर बरे होण्याच्या जिद्दीतून कोरोनावर मात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याबाबतचा व्हिडिओ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment