वडीलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 45 वर्षीय काकाची गळा चिरून हत्या !

Ahmednagarlive24
Published:
ठाणे  :- 19 वर्षीय तरुणाने 45 वर्षीय काकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर डोकं धडावेगळं करुन बॅगेत भरुन निर्जनस्थळी फेकून दिलं. 
दहिसर येथे राहणारे मयत विष्णू किसन नागरे (४५) याने त्यांचा भाऊ कृष्णा यास दोन वर्षांपूर्वी जादूटोणा करून मारले, असा त्यांचा पुतण्या अमित यास संशय होता.

काकाने जादूटोणा करुन वडिलांचा जीव घेतला, अशी अमितची धारणा होती. यातूनच त्याने काकांचा काटा काढायचा प्लॅन आखला होता.

अमितने काका विष्णू नागरे यांना दारु पाजली. त्यानंतर अमितने चौघा मित्रांच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. कोयता आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्राने आरोपींनी त्यांचा गळा चिरला.

हत्येनंतर विष्णू नागरे यांचं मुंडकं अमितने धडावेगळं केलं. ते बॅगेत भरुन तो बाईकने एका निर्जनस्थळी गेला आणि तिथेच ती बॅग त्याने टाकली. दरम्यान पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment