कोरोना लससाठी 6 महिने अवकाश; तो पर्यंत पाळा तज्ज्ञांनी दिलेल्या ‘या ‘ टिप्स

Ahmednagarlive24
Published:

पुणे जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. विविध देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

परंतु यावर लस येण्यासाठी किमान सहा महिने तरी लागतील, त्यामुळे कोरोनाव्हायरससह जगायला शिकायला हवं, असं पुण्यातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार, असं पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाव्हायरसवरील लसीबाबत जगभरात आधी संशोधन आणि मग परीक्षण अशा दोन टप्प्यात काम सुरू आहे. अशी लस तयार करताना परिणामकारकरता निश्चित करण्यासाठी ठरलेला कालावधी जाऊच द्यावा लागेल.

त्यामुळे त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. ते म्हणतात,   लस येईपर्यंत  पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या.

कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा.

शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment