सरकारने आठवा वेतन आयोग देण्याची तयारी सुरु केली आहे. देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. परंतु आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल, याची चर्चा सुरु झाली आहे. तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत.
कसा वाढेल पगार?
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. DA, फिटमेंट फॅक्टर आणि HRA म्हणजेच घरभाडे भत्त्याच्या दरांवरही या वेतनवाढीचा परिणाम होणार आहे. सहाव्या वेतन आयोगात HRA चे दर 30 टक्के (X सिटी), 20 टक्के (Y सिटी) आणि 10 टक्के (Z सिटी) करण्यात आले. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातही त्यात सुधारणा करण्यात आली.

हे दर सुमारे 24,16,8 टक्के होते. परंतु महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच HRA पुन्हा 30, 20, 10 टक्के करण्यात आला. याचा अर्थ HRA दर थेट DA आणि ‘बेसिक पे’शी संबंधित आहेत. त्यामुळे यंदाही सरकार मूळ वेतन व महागाई भत्ता रचनेनुसार आठव्या वेतन आयोगात पुन्हा एकदा HRA दरांचा आढावा घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
किती वाढेल पगार?
जर तुमचा जुना पगार 30,000 रुपये होता, तर तो 7 व्या वेतन आयोगात 77,100 रुपये झाला. परंतु 8 व्या वेतन आयोगात तोच पगार 85,800 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्याच वेळी, काही कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत, ज्यामुळे 30000 रुपयांचा जुना पगार 1,10,400 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
HRA रक्कम कशी वाढेल?
आतापर्यंत आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवून 1.92 करण्याची चर्चा आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ वेतनात 1.92 ने गुणाकार करून नवीन वेतनआधार निश्चित केला जाईल. हे उदाहरण द्यायचे झाले तर तुमचा बेसिक पगार 30 हजार रुपये असेल तर नवीन पगार 30 हजार × 1.92 = 57,600 होईल. अशा तऱ्हेने HRA चे गणितही नव्या बेसिकवर असणार आहे. ज्यामुळे HRA ची रक्कम वाढणार आहे.