अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर शहरातून शिवसेनेकडून लढण्याची तब्बल पाचजणांनी इच्छा दर्शवली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या पक्षाच्या मुलाखतींमध्ये या सर्वांनी आपली बाजू मांडली व शेवटी, ‘पक्षादेश आमच्यासाठी महत्त्वाचा राहील’, असेही आवर्जून स्पष्ट केले.
शहरातून मुलाखती देणारांमध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे तसेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांचा समावेश होता.

डॉ. नीलम गोऱ्हे, आ. परब व अन्य पदाधिकाऱ्यांनी सेनाभवनात मुलाखती घेतल्या. नगरमध्ये शिवसेनेचे २५ वर्षे आमदार असलेल्या राठोड यांचा मागील निवडणुकीत मतविभागणीत पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेकडून ते प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जाते.
पण नव्याने अन्य चार युवा इच्छुकांनीही लढण्याची तयारी दाखवल्याने राठोडांसमोर उमेदवारी मिळविण्याचे आव्हान असणार आहे. माजी महापौर फुलसौंदर व शिंदे यांच्यासह माजी शहरप्रमुख कदम तसेच नगरसेवक बोराटे या इच्छुकांनीही उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे नगरची उमेदवारी आता उत्सुकतेची झाली आहे.
मुलाखतीदरम्यान पक्षात किती वर्षे काम केले, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, पक्षवाढीसाठी काय केले, मतदारसंघाचे राजकीय गणित अशा विविध मुद्यांसह उमेदवारी दिली नाही तर काय करणार, असेही विचारल्याचे समजते. या प्रश्नावर मात्र सर्वांनीच पक्षादेश व मातोश्री आदेश शिरसावंद्य राहणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख