कर्जत :- कोणाचीही येऊ द्या हवा…. आम्ही हजारो भगिनी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत भावा असे सांगत कर्जत तालुक्यातील हजारो महिलांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.
बुधवारी गाठूया शिखर नवे……. महिला विकास सोहळा जिजाऊ मंगल कार्यालय,राशिन महिलांच्या भरगच्च उपस्थितीत व दणदणीत प्रतिसादातं संपन्न. त्यावेळी होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे अशा घोषणाही देण्यात आल्या.

जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात समाजप्रबोधनकार अॅड.अपर्णाताई रामतीर्थकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ, धनश्रीताई विखे-पाटील व सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कर्जत तालुका पंचायत सभापती साधना कदम, नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, जि.प.सदस्य सुनीताताई खेडकर, माजी सभापती पुष्पाताई शेळके, नगरसेविका वृषालीताई पाटील, वैशालीताई राजेभोसले, कांचनताई खेत्रे, मनीषाताई वडे, अनिता परदेशी, आसमा काझी, माधुरी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या
भारतीय जनता पक्षाच्या चित्राताई वाघ यांनी राशीन येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याला बुधवारी हजेरी लावली. त्यांनी प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत ते पुन्हां नामदार होणारच असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर उपस्थित महिलांना मौलिक मार्गदर्शन केले.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख