महिलांसह तिघांनी ९ लाखाला फसविले

Ahmednagarlive24
Published:

नगर – नगर शहरात जयहिंद सेल्स कॉर्पोरेशन गजानन कॉलनी नवनागापूर एमआयडीसी नगर येथे एका तरुणीस व इतर लोकांना २ महिला व एका पुरुषाने वेगवेगळे अमिष दाखवून  ९ लाखांची फसवणूक केली. 

त्यांना पैसे भरायला लावून पावत्या देवून मशिन व कच्चा माल न देता तसेच शाखा सुरु करण्यासाठी तरुणीकडून व लोकांकडून वेगवेगळ्या रकमा घेवून त्यांना पावत्या देवून त्यांच्या सोबत करारनामा करुन, विश्वास संपादन करुन काहींचे चेक तर काहींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करुन लोकांचा विश्वास संपादन केला व करारनामे भंग करुन लोकांकडून ९ लाख ६५ हजार ५०० रुपये घेवून फसवणूक केली. 


हा प्रकार डिसेंबर २०१५ मार्च २०१९ दरम्यान वेळोवेळी घडला. याप्रकरणी चैताली दत्तात्रय ननवरे, वय २६, रा. साईराजनगर, वडगाव गुप्ता, नवनागापूर या तरुणीने काल एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली.

पैसे घेवून फसवणूक करणारे आरोपी अजितकुमार महादेव हिवरे, रा. सातारा, वर्षा दिलीप तागडकर, रा, साइंबन रोड, नवनागापूर, एमआयडीसी, नगर, विजया बाबासाहेब मोहिते, रा, रेणुकामाता मंदिर परिसर, एमआयडीसी नगर, यांच्याविरुद्ध भादवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई सुपनर हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment