मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातू हवा म्हणून आमदार विद्या चव्हाण समवेत कुटुंबातील इतर चार सदस्यांनी छळ केल्याचा आरोप आमदार विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला होता. त्यानंतर आमदार विद्या चव्हाण यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे.