डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या हॉटेलला भीषण आग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-मुंबईतील धोबी तलाव परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये 25 डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या हॉटेललाच मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाला 25 डॉक्टरांचे प्राण वाचवण्यात मोठं यश आलं आहे. काही डॉक्टर्स चौथ्या तर काही टेरेसवर अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 जवानांनी शिडीच्या मदतीनं या सर्व डॉक्टरांना सुखरुप वाचवलं आहे.

सध्या या सर्व डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अधिक चौकशीनंतर ही आग कशाने लागली हे समजेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment