परभणी | ऊसतोड टोळीतील विवाहित महिलेचा तिच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराने कत्तीचे वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी २४ तासांतच आरोपी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळेला पुण्यातून अटक केली.
रामपुरी शिवारातील उसाच्या शेतात शनिवारी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तिचे विवाहापूर्वी संजय जोंधळे याच्याशी प्रेमसंबंध होते, ही बाब उघडकीस आली.
अटकेनंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली. घटनेच्या दिवशी महिलेने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.
तथापि, शेवटची भेट घेण्यास बोलावले होते. ती भेटण्यासाठी आली असता कत्तीने तिच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिला ठार केले.