नागपूर: दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या प्रकरणी आकाश संजय कारमोरे (वय 27) व शुभम संजय कारमोरे (वय 21, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
14 वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील विभक्त असल्याने आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहाते व एका विश्रामगृहात मजूरी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलगी लाखनी येथे शिकत असून दिवाळीच्या सुटीत ती आईकडे आली होती.
आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला व गोडीगुलाबीने बोलून तिला आमिषे दाखवले. मुलगी आमिषांना भूलल्याने आकाशने तिला पळवून नेले.
दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला शोधून पोलिस ठाण्यात आणले. महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
आकाशने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तसेच आकाशने तिला गंगापूर येथील त्याच्या मामाकडे ठेवल्याचे सांगितले. आकाशने पीडितेला आई वडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते.