अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर खरेदी करा. कारण, आतापर्यंत सोनं स्वस्त दरात मिळत आहे.
सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येक दिवशी चढ-उतार होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली तरी सोनं विकत घेण्यासासाठी जवळपास 45 हजार रूपये मोजावे लागत आहेत.
शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले.
शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 हजार रूपये मोजावे लागत आहे. पूर्वीपेक्षा सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात सोन्यासाठी मागणी वाढली आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ नोंदवण्यात येत होतीं. पण आज मात्र सोन्याच्या दरात घरसण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हिच संधी आहे.
सोन्याचे आजचे दर
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 44 हजार 240 45 हजार 60
पुणे 44 हजार 60 45 हजार 60
वर्ष 2020 मध्ये सोन्याच्या किमतीत तीव्र वाढ होण्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरस आहे, ज्यामुळे लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित स्थान शोधत होते. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित राहिलीय.
कोरोनामुळे लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक कमी केली, कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक आहे. गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सोन्यामध्ये हळूहळू वाढ होत होती, परंतु मार्चमध्ये भारतात कोरोना विषाणू आल्यानंतर यास वेग आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|