अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीगोंदे कारखान्यावरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले.
त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला.
यातूनच श्रीगोंदा कारखान्यावरील लोकांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती आली आहे अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना दुजाभावाची वागणूक दिली जाते
त्याचे शेजारीपाजारी त्याच्याशी तुसड्या सारखे वागतात पण श्रीगोंदा कारखान्यावरील नागरिकांनी आपुलकी दाखवत या व्यक्तीचे केलेले स्वागत हे माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews