ऊस तोडणी मजुराचे मुकादामानेच केले अपहरण; मागितली खंडणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- सोलापूर येथील मुकादमाने उसतोड कामगाराच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या मजुराचे अपहरण केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यातील राजूर परिसरात घडला आहे.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, सध्याच्या गाळप हंगामासाठी महेबूब मुलानी याने राजुरी येथील वसंत संपत जाधव वय ५० यांच्याकडे काही मजुरांची मागणी केली.

त्यावरून जाधव यांनी खिर्डी येथील काही तोडणी मजुरांशी मुलानी यांच्याशी भेट घालून दिली. मुलांनी याने मजुरांना १२ हजार रुपयांची उचल दिली परंतु मजूर कामावर गेले नाही.

त्यानंतर वसंत जाधवने २० डिसेंबर रोजी वसंत जाधव यांच्या घरी येऊन मारहाण केली व जबरदस्तीने कारमध्ये बसून नेले व जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव यांच्या मुलाला फोन करून जाधव याला सोडण्यासाठी ०४ लाख रुपयांची मागणी केली.

मजुराची पत्नी छाया वसंत जाधव यांनी पोलीस फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलसांनी महेबूब मुलानी याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार ज्ञानदेव मरभळ हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe