अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : सत्तेत राहून काम करणे सोपे असते. राज्यात व जिल्हा परिषदेत वेगळ्या विचारांचे सत्ताधारी पदाधिकारी आहेत. आता खरी कसोटी विकास निधी खेचून आणण्यासाठी लागणार आहे.
सभापती, उपसभापती यांना सुरळीत कामकाजाकरिता ज्येष्ठ, अनुभवी, अशा भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पाथर्डी पंचायत समितीच्या नूतन सभापती सुनीता गोकुळ दौंड आणि उपसभापती मनीषा रवींद्र वायकर यांच्या पदग्रहण समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या.
या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे तालुकध्यक्ष अमोल गर्जे, गटविकासधिकारी सुधाकर मुंडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड ,उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, काशीबाई गोल्हार, पुरुषोत्तम आठरे, बाळासाहेब अकोलकर, उत्तम गर्जे, काकासाहेब शिंदे ,धनंजय बडे, संदीप पठाडे, पं. स. सदस्य सुनील ओव्हळ, विष्णुपंत अकोलकर, सुनील परदेशी, राहुल गवळी ,एकनाथ आटकर, सरपंच विजय बोरुडे, रणजित बेळगे ,मधुकर काटे, बाबासाहेब ढाकणे, रामकिसन काकडे आदी उपस्थिती होते.