अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत.
औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एस टी औरंगाबाद हुन राजगुरू नगर येथे जात असताना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रक ची जोराची धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला.
पण काय घडले हे कोणाला लवकर समजले नाही, अपघात झाल्याचे समजताच एकच आरडाओरडा झाला. यात 2८ प्रवाशी जखमी झाले.
बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल आणि अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी पाच ते सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहक समावेश आहे.
जखमींमध्ये औरंगाबाद व पुणे येथील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक व इतर वाहन चालकांनी मदत केली व जखमींना तातडीने रुग्णालयात हरवण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगितले जात आहे.
- Vikram Solar Share Price: सौर ऊर्जा क्षेत्रातील ‘या’ शेअर्समध्ये मोठी तेजी! अप्पर सर्किट हिट…BUY करावा का?
- 7th Pay Commission: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांची दिवाळी? महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ? समोर आली महत्वाची माहिती
- Ration Card: आता घरबसल्या काढा मोफत नवीन रेशनकार्ड! वापरा ‘या’ स्टेप…एका क्लिकवर वाचा A टू Z माहिती
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! खात्यात ‘या’ महिन्यात जमा होणार 3 हजार? वाचा माहिती
- Goods Price: सणासुदीत करा जोरात खरेदी! दैनंदिन वापरातल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर होणार स्वस्त… बघा माहिती