वऱ्हाडाच्या बसला अपघात; १८ प्रवाशी जखमी

Ahmednagarlive24
Published:

पालघर :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरजवळ लग्नाची वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे.सकाळी पहाटे सुमारास ही घटना घडली. या घटनेत कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी १८ जण जखमी आहेत. 

यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या वऱ्हाडीची बस वसईहून वलसाडला निघाली होती. यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळील नांदगाव-चिल्हार फाट्यादरम्यान असलेल्या बेलपाडा येथे चहा-पाण्यासाठी थांबवली होती. 

सर्व उरकल्यावर मुख्य रस्त्यावर येण्यासाठी बस मुंबई-गुजरात वाहिनी ओलांडत होती. त्याचवेळी गुजरातकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने बसला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक प्रवाशांना मुका मार लागला.

 या अपघातात तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे या जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment