अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त प्रदीर्घ कालावधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते.
मात्र या आयोजित कार्यक्रमामध्ये चांगलाच गोंधळ झाला होता. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले आहे.
यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
यानंतर अचानक कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामनेही भिडले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved