ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली ही मागणी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक कर्जाची जाचक अटी शिथिल करून पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकरी सध्या दुष्काळाशी सामना करावा लागत आह.े राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली असून, सदर योजनेत काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर काहींना झाली नाही.

त्यामुळे त्यांनी ३१ मार्चपर्यंत २०२० पर्यंतचे व्याज बँकेकडे भरणा केला आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने सध्या शासनाने कर्ज वाटप सुरू केल असून, बँकांकडून कर्ज देताना ७ बारा ८ अ इतर कागदपत्रे मागणी केली जात आहे.

कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी असल्याने कार्यालये बंद आहेत. त्याचसोबत तलाठी व शासकीय अधिकारी यंत्रणेत कार्यरत असल्या कागदपत्रे मिळणे अवघड झाले आहे.

सेतु सुविधा केंद्रबरोबर इतर ऑनलाईन सोयीही लॉकडाऊनच्या बंद आहेत त्यामुळे कागदपत्रे मिळत नाहीत म्हणून कर्ज मिळत नाही.

खरीप हंगामावर तोंडावर आल्याने मशागत बी-बियाणे रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असून, टाळेबंदी संपेपर्यंत कागदपत्राची अटीची शिथीलता करून शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप करावे.

अशी मागणी ढाकणे यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,कार्यकारी संचालक जिल्हा सहकारी बँक, जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक,तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment