संगमनेर :- आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संगमनेर मध्ये बोलताना व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे रविवारी संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. घारगाव येथे आदित्य यांनी शेतात जाऊन ज्वारीची पेरणीही केली.
‘जनतेच्या अनेक प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,’ असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही जनआशीर्वाद यात्रा काढली नाही. तर शेतकऱ्यांना भेटून त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे.
ही जनआशीर्वाद यात्रा नसून तीर्थयात्रा आहे. शिवसैनिक हा निवडणुकीतच नव्हे तर सतत जनसेवेसाठी कार्यरत असतो.
ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे. यापुढेही ते असेच सुरू राहील.
या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, युवा संपर्कप्रमुख रणजीत कदम आदींसह तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !
- ‘या’ मुलांकाच्या लोकांवर केतूचा असतो प्रभाव; अचानक रात्रीतून मिळतो छप्पर फाड के पैसा
- गुलाबाच नाही तर, ‘या’ 2 ठिकाणी असतात वर्षभर विदेशी पर्यटक; ही ठिकाणे स्वर्गाहून कमी नाहीत