कौतुकास्पद! आधी कर्तव्य मग आईवर अंत्यसंस्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यांच्या या महान कार्यामुळे आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अशीच एक घटना कल्याण शहरात घडली.

येथील एका डॉक्टर्सने आपल्या आईच्या मृत्यूपेक्षाही आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केल्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे.

कल्याणमधील गर्भवती महिला शबा शेख ही प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात गेली होती. परंतु त्याठिकाणी आयसीयु नसल्याने तिला कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले.

मात्र त्याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून दुसऱ्या दिवशी तिला सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना समजताच त्यांनी तातडीने कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून या महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली.

त्यावर डॉ.यांनीही तातडीने प्रतिसाद देत आयएमएकडून या महिलेची निःशुल्क प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार या महिलेला कल्याणातील वैष्णवी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याठिकाणी तिची प्रसूती होत असतानाच मुख्य डॉक्टर अश्विन कक्कर यांच्या मातोश्री मधूलिका कक्कर यांचे निधन झाले.

मात्र स्वतःवर कोसळलेले एवढे मोठे दुःख बाजूला ठेवत डॉ. अश्विन कक्कर यांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत या महिलेची सुखरूप प्रसूती केली आणि त्यानंतर आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले. या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment