चार महिन्यानंतर महाराष्ट्रातील ‘हा’ प्रसिद्ध किल्ला पर्यटकांसाठी खुला! बनवा कुटुंबासोबत ट्रिपचा प्लान, अनुभवा विस्तीर्ण समुद्र आणि किल्ल्याचे दर्शन

ऐतिहासिक ठेव्याने समृद्ध असलेले अनेक गड किल्ले देखील महाराष्ट्रात असून शिवकालीन आणि अनेक इतिहासकालीन गोष्टींची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यांना भेट देणे खूप महत्वाचे ठरते आणि हा एक अप्रतिम असा अनुभव ठरतो. गड किल्ल्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी किल्ले आहेत.

Published on -

Maharashtra Fort: महाराष्ट्रमध्ये पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर असून तुम्ही कुठल्याही हंगामात किंवा कुठल्याही महिन्यांमध्ये ट्रिप प्लान केली तरी तुम्हाला अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येते. निसर्गाने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे तसेच गड किल्ले, पावसाळ्याच्या दिवसात खळाळून वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे त्यांचे मनोहरी दृश्य महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला दिसून येते.

तसेच ऐतिहासिक ठेव्याने समृद्ध असलेले अनेक गड किल्ले देखील महाराष्ट्रात असून शिवकालीन आणि अनेक इतिहासकालीन गोष्टींची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यांना भेट देणे खूप महत्वाचे ठरते आणि हा एक अप्रतिम असा अनुभव ठरतो. गड किल्ल्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी किल्ले आहेत.

परंतु त्यातील मुरुड जंजिरा हा किल्ला जर पाहिला तर तो खूप वैशिष्ट्यपूर्ण असा किल्ला असून हा एक अजिंक्य असा किल्ला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य बघितले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले.

परंतु आज पर्यंत हा किल्ला कोणाला देखील जिंकता येणे शक्य झालेले नाही.हा किल्ला तब्बल चार महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून या ठिकाणी आता पर्यटकांना भेट देता येणे शक्य आहे.

 मुरुड जंजिरा किल्ला आहे वैशिष्ट्यपूर्ण

मुरुड जंजिरा किल्ला हा एक अजिंक्य किल्ला असून आजपर्यंत हा किल्ला कोणाला जिंकता आलेला नाही. चार महिन्यानंतर हा किल्ला आता पर्यटनासाठी खुला करण्यात आला असून त्या ठिकाणी जलवाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदर तसेच राजपुरी जेटी आणि दिघी बंदरातून प्रवासी वाहतूक केली जाते.

मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये पावसाळ्यात प्रवेश बंदी केली जाते व त्यामुळे किल्ल्याकडे जाणारी प्रवासी जलवाहतूक थांबवण्यात येते. यावर्षी साधारणपणे 26 मे पासून पर्यटनासाठी हा किल्ला बंद करण्यात आलेला होता. मुरुड जंजिरा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अरबी समुद्रात उभारण्यात आलेला भव्य दिव्य किल्ला असून किनाऱ्यावरूनच पर्यटकांना हा किल्ला आकर्षित करतो.

या किल्ल्यापर्यंत जायचे असेल तर शिडाची होडीच्या माध्यमातून जाता येते व जाण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. अलिबागच्या मुरुड बेटावर हा किल्ला बांधण्यात आला असून 22 एकर परिसरामध्ये हा किल्ला पसरलेला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे 90 फूट उंचीवर मुरुड जंजिरा किल्ला आहे.

तुम्ही बंदरावर उतरता तेव्हा शिडाच्या होडीने तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाता येते. जेव्हा आपण होळीच्या साह्याने प्रवास करत असतो व किल्ला जसा जसा जवळ यायला लागतो तसतसा किल्ला किती भव्य आहे हे आपल्याला जाणवायला लागते व किल्ल्याची भव्यता स्पष्टपणे डोळ्यात साठवून ठेवावीशी वाटते.

मुरुड जंजिरा किल्ला हा साधारणपणे मुंबई शहरापासून दक्षिण दिशेला आहे व मुंबईच्या दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर समुद्रात बांधण्यात आलेला किल्ला आहे. देश-विदेशातून अलिबागला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा किल्ला असून पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे.

त्यामुळे या ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर मुरुड जंजिरा किल्ला हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News