पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या अहमदनगर मधील दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात अनेकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

सर्वसामान्यांचे कंबरडे महागाईने मोडले आहे. आता पेट्रोलच्या दरातही वाढ झाली आहे. देशात काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

  • पेट्रोलचे दर ; अहमदनगर – ९७.६६ प्रतिलिटर
  • डिझलचे दर : अहमदनगर – ८८ .५६ प्रतिलिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.

तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe