अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- वय वर्षे फक्त २८ आणि या वयात तब्बल ४ कंपन्यांचा मालक. कोट्यवधी रुपयांची संपत्ती… अन सोबतीला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद…
असे सारे आलबेल आणि नेत्रदीपक असतानाही मुंबईचा प्रसिद्ध व्यवसायिक आणि इव्हेंट मॅनेजर पंकज कांबळे या तरुण उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
या खोलीतून पोलिसांना एक डायरी मिळाली आहे. या डायरीत आय लव्ह यू निलम असे लिहिले असल्याचे समजते. या डायरीत आणखी काय आहे याबबत उत्सुकता आहे.
इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशन दप्तरी पंकज याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सापडलेल्या डायरीत ‘आय लव्ह यू निलम’ असा लिहिले आहे.
तसेच पंकज याच्या बँक खात्यावर एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. डायरीत सापडलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, प्रेम, तणाव आणि नौराश्य आशा कारणातून पंकज कांबळे यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com