अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४,
राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत.
नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ केडगाव येथील ०१ आणि भूषणनगर येथे ०१ रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे.
शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डी मधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१
आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews