अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यात कॉलेजला गेलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भोकर परिसरात राहणार्या एका कुटुंबातील १६ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी ८ जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता एसटी बसने श्रीरामपूर येथील कॉलेजला जाते, असे सांगून घरातून गेली,
परंतु ती रोजच्या प्रमाणे कॉलेज संपल्यानंतर घरी आली नाही. त्यामुळे सदर मुलीचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडेही शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही .
सदर भोकर येथील या कॉलेज विद्यार्थिनीला कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.
याप्रकरणी काल भोकर येथील मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसानत वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.