अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा :- तालुक्यातील सलाबतपूर ते गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात ऊस वाहतूक करणार्‍या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला.

याबाबत माहिती अशी की, काल शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सलाबतपूर-गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात औताडे वस्तीनजीक इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु. विद्या राजेंद्र औताडे (वय 10) ही रस्त्यावरून आपल्या आजीकडे जात होती.

सलाबतपूरकडून भेंड्याकडे जणार्‍या ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने या मुलीला धडक दिली. मुलगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच गतप्राण झाली.

जवळच असलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात येताच. त्यांनी ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

घटनेनंतर मुलीला लगेच रुग्णवाहिकेतून नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.अपघाताबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment