अहमदनगर Live24 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका युवकाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पेडगावमध्ये राहणार्या एका युवकाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून बौद्ध धर्माचे समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केले.
14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील समाजकंटक रोहित भाऊ मोहिते राहणार पेडगाव तालुका श्रीगोंदा याने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एकच खळबळ उडाली.
त्यामुळे त्यांच्यावर फिर्यादी भीमराव ज्ञानदेव म्हस्के वय 31वर्षे राहणार पेडगाव तालुका श्रीगोंदा याच्या फिर्यादी वरून गु.र.क्र व कलम – 349/2020 भादवि कलम 295(अ), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®