अहमदनगर ब्रेकिंग : बोलेरो जीप कंटेनरखाली घुसली चार जणांसोबत झाले असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल (खंदरमाळ) येथे बोलेरो जीपचालक पुढे चालणार्‍या कंटेनरखाली घुसल्याचा प्रकार समोर आलाय. 

दरम्यान या घटनेत चालक जखमी झाला आहे.  तर चार जण थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोलेरो जीपवरील (क्रमांक एमएच.१४, ईपी.३८४८) चालक राजू चंद्रकांत राजगुरू, वनिता विलास राजगुरू,

रूपाली शिवाजी राजगुरू, स्वरा शिवाजी राजगुरू, युवराज शिवाजी राजगुरू (सर्व रा.ममदापूर, ता.राहाता) हे सर्वजण सोमवारी बोलेरो जीपमधून पुणे-नाशिक महामार्गाने घारगावच्या दिशेने जात होते.

बोलेरो जीप खंदरमाळवाडी शिवारातील एकोणावीस मैल येथे आली असता त्याचवेळी बोलेरो जीपच्या पुढे कंटेनर (क्रमांक पीबी.12, सीएन.2987) हा चालला होता. त्याच दरम्यान बोलेरो जीप कंटेनरखाली घुसली.

यामध्ये चालक जखमी झाला तर इतर चार जण बालंबाल बचावले. अपघातानंतर तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हेही आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

कंटेनर व बोलेरो जीप बाजूला घेऊन महामार्ग अपघातासाठी खुला करण्यात आला. या अपघातात बोलेरो जीपचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News